अंतर
रात्रीचा दिवस अन
दिवसाची रात्र होतांना
क्षणांचे मिनीटे अन
मिनीटांचे तास होतांना,
आठवण
तुझी संपत नाही,
प्रत्येक नवा श्वास घेतांना.
जागलेपणी
झोपतांना नि
झोपल्यावर
सुद्धा जागतांना,
सारखं
उठून बसतांना नि
कुशा
नेहमी बदलतांना,
आठवण तुझी संपत नाही,
तराळलेले डोळे पुसतांना.
दोघांनी
स्वप्न बघतांना,
तुझे
घर माझ्या घरात असतांना,
एकमेकांच्या
बाहूपाशात अन
रोमारोमात
घुसतांना
काहीच कसे वाटले नाही,
माझा हात झटकून जातांना.
तुझं घर सावरतांना,
आपली पिल्लं
सांभाळतांना,
माझं असं भरकटतांना
अन
आयुष्याची धावाधाव
करतांना,
तुला मात्र बरं वाटत असेल,
ढगांआडून बघतांना.
अतुल
धायडे.
फार उत्कट भावना ...!
ReplyDeleteThank you prabhu sir,thanks for every thing.you know what I mean.
DeleteThank you prabhu sir,thanks for every thing.you know what I mean.
Delete