जीवनाssss
जीवनाss तुझं नि माझं,
नेहमीच वाकडयं.
तु निट चलावस म्ह्णून,
देवाला माझं साकडयं.
तो सुद्धा याबाबतीत
ऐकत नाही माझं,
आणि नेहमी
खरं करतो तुझं.
तुझ्या पासून पळायचं म्हटलं,
तर पळता येत नाही.
दोन हात करायचे,
तर करता येत नाही.
तरीही.........
आता मी ठरवलय,
पुन्हा complaint करणार नाही.
तुझ्याबरोबर जगतांना,
मागे सरणार नाही.
बघुया! जिंकता येतय काय?
तसंही तुला हरविल्याशिवाय,
मी मरणार नाही.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteही वाट जीवनाची
ReplyDeleteआपली निवड नसते
या वाटेवर आपण असणं
ही नियती असते
आपल्या बोटाला धरून
कुणीतरी आणलं या वाटेवर
पुढचं चालणं मात्र
सोडून दिलं आपल्यावर
मागच्या वळणावर सोडून संकटांना
जर पुढे जात राहाल
या चढावा नंतरच नक्की
प्रकाशाच्या वाटा पहाल